बाबीला मोर खूप आवडतो. तिच्याकडे अनेक प्रकारचे मोर आहेत अन ती त्यांना प्रेमाने वागवते.
मोर आवडण्याचे एक कारण म्हणजे देवी सरस्वती मोरावर बसते. (देवी सरस्वती कमळावर बसते हेही तिने पाहिले आहे)
त्यामुळे मोर हाताला लागला, की बाबी त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न करते.
जीजी: अगं, काय करतेस, टोचेल ना तो पिसारा/मोराची टोकदार शेपटी?
बाबी: मी सरस्वती देवी आहे ना!
जीजीला लहानपणी वाचलेले आणि मनात कोरले गेलेले थॉमस अल्वा एडिसनचे चरित्र आठवले. लहानगा एडिसन कोठे गेला, म्हणून सर्वजण त्याला शोधत होते, तेव्हा तो गोठ्यात अंड्यांवर बसलेला सापडला. आई म्हणाली अरे काय हे! काय करतो आहेस! एडिसन म्हणाला, कोंबडीसारखे अंड्यांवर बसून पिल्ले बाहेर येतात का बघत होतो.
जिजीची बाबीही अशीच आहे एडिसन सारखी बुद्धिमान, प्रयोगशील, बारकाईने निरीक्षण करणारी, त्यावरून स्वतःचे आडाखे बांधणारी. देवी सरस्वती!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा