बाबीला एखादी गोष्ट करायची नसेल, किंवा आवडली नसेल तर ते दर्शवण्याचे विविध मार्ग तिच्याकडे आहेत.
त्यातला एक म्हणजे शब्दांशी खेळणे. मोठ्या माणसांनी होकारार्थी वाक्य केले असेल तर त्याचे नकारार्थी वाक्य करून निषेध दर्शविणे. आणि याच्या उलटही.
बाबी, असं करायचं नसतं, असं जीजी म्हणाली की बाबी रागावली असल्यास आलेच निषेधाचे वाक्य: "असं करायचं असतं"
जीजी: बाबी, बूट न घालता गॅलरीत उतरायचं नसतं, माहीत आहे ना तुला?
बाबी : बूट न घालता गॅलरीत उतरायचं असतं.
जेव्हा गॅलरीत उतरायचं मनात असतं तेव्हा काही वाद न घालता बूट घालून बाबी तयार असते.
जीजी: बाबी, दूध पटापट पिऊन संपवायचं असतं.
बाबी: दूध पटापट पिऊन संपवायचं नसतं.
बाबी एकावेळी नीट लक्षात ठेऊन दोन वाक्यांवरही प्रयोग करते.
जीजी: बाबी, तुला खीर आवडते ना? मग चल, खीर चटकन पिऊन टाक.
बाबी: मला खीर आवडत नाही (हे खरं तर खोटं आहे, बाबीला खीर आवडते, पण आता रागावल्यामुळे ती आवडेनाशी झाली). खीर चटकन पिऊन टाकायची नसते.
बाबी दोन नकारार्थी वाक्येही लीलया होकारार्थी करते.
या पेक्षाही दैदिप्यमान कार्य म्हणजे एक होकारार्थी आणि दुसरे नकारार्थी वाक्य असेल तरीही बाबी योग्य प्रकारे निषेध नोंदवतेच.
जीजी: बाबी, पणजी मोठी आहे ना? मग तिला त्रास द्यायचा नाही.
बाबी: पणजी मोठी नाही. तिला त्रास द्यायचा असतो. (हे केवळ राग आला असतानाच. एरवी पणजी म्हणजे फारच जवळची मैत्रीण)
कितीही मोठे वाक्य असले तरी बाबी ते अचूकपणे रिपीट करते.
क्या बात है बाबी! You are just great!
How does she process such complicated information and express herself (her anger, her refusal to do something, refusal to act on the orders of elders etc.) correctly, effectively and efficiently!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा