संध्याकाळी ६ ची वेळ. स्थळ जीजीच्या घराचा हॉल. बाबीला प्रचंड झोप येतेय पण झोपायचे मनात नाही. जीजी तिला कडेवर घेऊन २-३ फेऱ्या मारेल आणि बाबी झोपी जाईल याची
आत्तापर्यंतच्या अनुभवावरून जीजीला खात्रीच आहे. बाबीला झोपायला मदत करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एखादे ओळखीचे गाणे अतिशय लहान आवाजात म्हणणे.
जीजीने 'शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा ..' सुरु केले.
बाबी ऐकत होती. "मासा म्हणाला, शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात, पोहत राहीन प्रवाहात...."
बाबीने विचारले, 'जीजी, माश्याला हात असतात?'
जीजी: 'नाही ग, माश्याला वाटतं आपली शेपटी म्हणजे हातच आहे.'
गाणं पुढे चालू. ...
कांगारू म्हणाले, माझे काय? तुझे काय? हा हा हा शेपूट म्हणजे पाचवा पाय!
बाबी म्हणाली, 'कांगारूला पाच पाय असतात?'
जीजीच्या उत्तराची वाट न बघता पुढचा प्रश्न "कोणाला पाच पाय असतात का?"
जीजीला वाटलं होतं बाबी झोपलीय, पण बाबींचा मेंदू प्रत्येक इनपुट वर प्रोसेसिंग करतोच आहे!
जीजी म्हणाली, 'नाही बाबी, कांगारूला आणि इतरांनाही जास्तीत जास्त चारच पाय असतात. दोन किंवा चार. (आत्ताच मिलीपेड, सेंटिपेड बद्दल नको सांगायला) पण कांगारूंची शेपटी पण पायासारखा आधार देते.'
हे ऐकण्याच्या आधीच बाबीची ब्रह्मानंदी टाळी लागली म्हणून बरं!
वसुधा, खूप छान वाटतंय वाचायला। लिहीत रहा। बाबीला भेटायची इच्छा आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुनेत्रा
उत्तर द्याहटवा