परवा बाबीला गाणे म्हणायचा मूड आला होता. "ऐलमा पैलमा गणेश देवा"
पुढची ओळ म्हणत होती.
माझा खेळ मांडीवर, करीन तुझी सेवा.
जीजी: बाबी, मांडीवर नाही, मांडिला. 'माझा खेळ मांडिला' असं आहे ते.
बाबी: जीजी, मांडिला म्हणजे काय?
बाबीला 'मांडीवर' म्हणजे काय ते चांगलं ठाऊक होतं पण 'मांडिला' हा शब्द नवीन (आणि आता तर हा कोणी वापरतही नसेल.)
बाबीला एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसला तर ती लगेच त्याचा अर्थ काय हे विचारते. हे किती चांगले आहे!
शाळेत गेली की हे विचारणे बहुधा कमी कमी होत जाते, "गप्प बस, किंवा 'मूर्खासारखं काहीतरी विचारू नकोस', किंवा 'एवढेही तुला माहीत नाही? कठीण आहे' अशी मुक्ताफळं ऐकली की बाबी हा प्रश्न विचारायचे थांबवेल.
एक चांगले आहे, आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने विद्यार्थ्यांमध्ये चौकस बुद्धी निर्माण करण्याला महत्व दिले आहे!
बाबीने हे वाचले तर ती विचारेलच "चौकस बुद्धी म्हणजे काय, जीजी?"
खूपच छान.कमी शब्दात खूप व्यक्त झालय.आजच्या पालकांसाठी आवश्यक.बाल मन समजून घेण्यास मदत होईल. सुंदर कल्पना .वसुधा,अभिनंदन.
उत्तर द्याहटवामी शोभा अधिकारी/अनुपमा कुळकर्णी
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवावसुधामॕम , हे संवाद रुपालतं लेखन आणि सोबतच्या तुम च्या टिप्पण्या शिक्षकांना (सर्व विषयाच्या-असं म्हणण्याचं कारण इतर विषयाचा शिक्षकाला भाषेचा अभ्यास करणं शब्दकोश वापरणं कमी पणाचं वाटतं. असो.) आणि अभ्यासकांना उपयुक्त होईल. धन्यवाद!!
उत्तर द्याहटवा~रुपालत~ रुपातलं
उत्तर द्याहटवाएक दुरुस्ती -- रुपातलं
उत्तर द्याहटवामी संध्या शहापुरे
उत्तर द्याहटवासंध्या, खूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवा